एकीकडे सेलिब्रिटींच्या ‘क्वारंटाइन टाइम’ची चर्चा सुरू असताना दुसरीकडे गायक मिक सिंगच्या ‘क्वारंटाइन लव्ह’ची चर्चा सुरू झाली आहे. मिका अभिनेत्री चाहत खन्नाला डेट करत असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. चाहतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मिकासोबतचे फोटो पोस्ट केले असून कॅप्शनमध्ये ‘क्वारंटाइन लव्ह’ असं लिहिलं आहे.

या दोघांचे फोटो पाहून मिका व चाहत एकमेकांच्या प्रेमात पडलेत की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. तर दुसरीकडे हे दोघं पब्लिसिटीसाठी करतायत असंही म्हटलं जात आहे. या दोघांचा ‘क्वारंटाइन लव्ह’ या नावाने अल्बम येत असल्याने त्यांनी असे फोटो टाकले असावेत, असा अंदाज एकाने व्यक्त केला आहे.

आणखी वाचा : ‘शेवटची फुल पँट कधी घातली होती आठवतच नाहीये’; प्रसाद ओकची भन्नाट पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिका व चाहत एकाच सोसायटीत राहतात. त्यामुळे लॉकडाउनदरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढली असावी, असेही कमेंट या फोटोवर येत आहेत. आता हे ‘क्वारंटाइन लव्ह’ नेमकं काय प्रकरण आहे हे मात्र मिका व चाहतच सांगू शकतील.