देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या जे काही करतेय त्यात तिला यश मिळत आहे. बॉलिवूडमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवल्यानंतर तिने तिचा मोर्चा हॉलिवूडमध्ये वळवला. तिथेही तिने मेहनतीने आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवला. त्यामुळे तिच्या याच यशाचं बक्षिस तिने स्वतःला दिलं आहे. तिने वर्सोव्यामध्ये एक घर विकत घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका मुंबईत एक घर बनवत असून त्याची किंमत थोडीथोडकी नसून साधारण १०० कोटी असणार आहे. भारतात आतापर्यंत कोणत्याच अभिनेत्रीचे एवढे महागडे घर नाही. यावरून तिचे महत्त्व आधोरेखित होतं.

मुंबईतील वर्सोवा भागात तिचे हे स्वप्नातील घर तयार होणार असून एका टॉप बिल्डरला तिने हे काम सोपवल्याचे वृत्त कळत आहे. सर्व अत्याधुनिक सुखसुविधांनी सज्ज असलेले हे घर एखाद्या राजमहालापेक्षा कमी नसावे अशीही तिने सूचना केली आहे.

सध्या या घराचे बांधकाम सुरू असून प्रियांका कामात व्यस्त असूनही स्वत: प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीकडे लक्ष देत आहे. ‘क्वांटिको’च्या दुसऱ्या सीझनच्या शूटिंगमध्ये प्रियांका व्यग्र आहे. ती या मालिकेत एका सीआयए एजंटची व्यक्तिरेखा साकारत आहे. तसेच तिची पहिली निर्मिती असलेला व्हेंटिलेटर हा मराठी सिनेमाही प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे सध्या ती स्वतःवर भलतीच खुष आहे. आतापर्यंत बॉलिवूड कलाकारांमध्ये किंग खान शाहरुखचेच घर सर्वात महागडे असल्याचे म्हटले जाते. आता प्रियांकाही त्याच तोडीचं घर बनवत आहे. अभिनेत्रींपैकी सर्वात महाग घर असलेली प्रियांकाच असेल यात काही शंका नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is priyanka chopra buying new house in mumbai for rs 100 crore
First published on: 27-10-2016 at 16:51 IST