लोकप्रिय गायक, अभिनेत्री शहनाज गिल आणि दिलजीत दोसांज ‘हौंसला रख’ या पंजाबी चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप सुरु करण्यात आलेले नाही. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाजला मोठा बसला. त्यामुळे चित्रीपटाचे चित्रीकरण लांबणीवर टाकण्यात आले. आता शहनाजने पुन्हा चित्रीकरणास सुरुवात केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१५ सप्टेंबर रोजी चित्रपटाचे प्रमोशनल गाणे चित्रीत करण्याचे निर्मात्यांनी ठरवले होते. पण आता चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले आहे. ‘हौंसला रखा’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी चित्रपटाच्या अपडेट विषयी माहिती दिली आहे.

‘आम्ही शहनाज ठिक होण्याचा आणि या सर्वातून बाहेर येण्याची वाट पाहात आहोत. या पूर्वी आम्ही १५ सप्टेंबर रोजी लंडनमध्ये चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण करण्याचे ठरवले होते. पण ते शक्य झाले नाही. आम्ही चित्रीकरणाच्या नव्या तारखा लवकरच ठरवणार आहोत. तसेच शहनाज या प्रोजेक्टमध्ये असेल यासाठी प्रयत्न करत आहोत. कारण ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मी तिच्या मॅनेजरशी सतत संवाद साधत आहे आणि मला आशा आहे की ती लवकरच आमच्याशी संवाद साधेल’ असे निर्माते म्हणाले.

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज कोणाच्याही समोर आलेली नाही. तिला भेटण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आले होते. लवकरच शहनाज यासर्वातून बाहेर पडेल अशी आशा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is shehnaaz gill resume shooting for her film opposite diljit dosanjh avb
First published on: 22-09-2021 at 19:32 IST