“ज्या ब्रॅंडमुळे माझी लायकी काढण्यात आली होती आज त्याच ब्रॅंडसोबत काम करायला मिळवण्याचा आनंद”

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने तिच्यासोबत आधी घडलेला एक किस्सा पोस्ट केला आहे. तिला इतकं अपमानास्पद कधीच वाटलं नव्हतं

urmila nimbalkar
आपल्या आवडत्या ब्रॅंण्डबरोबर काम करुन पैसे मिळवण्याचा आनंद उर्मिलाला आहे. (फोटो: @urmilanimbalkar/Instagram)

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर तिच्या सोशल मिडियावरील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्मिला कोणत्याही गोष्टीवर असलेलं तीच मत ती अगदी स्पष्टपणे मांडत असते. उर्मिलाला तिच्या या स्वभावामुळे अनेकदा वाईट प्रतिक्रियांचा आणि ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. या विषयीचा एक किस्सा सांगत उर्मिलाने एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे. यात तिने मालिकेसाठी शुटिंग करत असतांना तिच्या बाबतीत घडलेला एक प्रकार सांगितला आहे. तेव्हाची ती घटना आणि आजची परस्थितीही उर्मिलाने त्या पोस्टमध्ये सांगितली आहे.

काय आहे घटना?

“त्या हिंदी मालिकेच्या सेटवर त्या मालिकेतील हिरोईनची मेकअप आणि हेअर ड्रायरची बॅग चोरीला गेली. त्याचवेळेस पैसे साठवून उर्मिलाने M.A.C. Cosmetics India ची एक लिपस्टिक विकत घेतली होती. तेवढी एकच लिपस्टिक अप्रतिम क्वालिटीची, ब्रॅंडेड आणि माझ्या ओठांना रॅश न येऊ देणारी असल्यामुळे उर्मिला प्रत्येकच शुटिंगमधे तीच लिपस्टिक वापरायची. मराठी कलाकाराच्या पर डे पेक्षा मोठ्या किंमतीची लिपस्टिक तिच्या हातात दिसल्याने, तिच्यावर चोरीचा पहिला संशय घेण्यात आला होता. या प्रकरणात तिचा काहीही संबंध नसल्याने, साहजिकच त्यांना तिने तिची संपुर्ण बॅग चेक करु दिली,” असे उर्मिला म्हणाली.

आता त्याच ब्रॅंण्डबरोबर काम करणार!

घडलेली घटना सांगताना पुढे उर्मिला सांगते की, “माझा मोठा भाऊ भारतातील सर्वात तरुण IPS अधिकारी म्हणून निवडला गेलेला असून, माझे वडिल व्याख्यान आणि प्रवचने करतात. माझ्या कुटुंबातील प्रत्तेक पुरुष पिढ्यांपिढ्या शेती करतोय. कलेचा कसलाही वारसा नसलेल्या कुटुंबातील मी पहिलीच मुलगी आहे, जी एकटी २ बस आणि २ लोकल बदलून, मुंबईत प्रामाणिकपणे ॲाडिशन पास करुन, सेटवरील एकमेव मराठी कलाकार असूनही वेगळ्या भाषेत काम करतीय. बेंबीच्या देठापासून ओरडून मला त्यांना सांगायचं होतं की मी चोर नाही. त्या माझ्या सर्वात आवडत्या एकमेव लिपस्टिक मुळे माझी डायरेक्ट लायकी काढण्यात आली होती. इतकं अपमानास्पद कधीच वाटलं नव्हतं मला.”

नुकताच तिला त्याच ब्रॅंण्डचा मेल आला आहे. ‘आम्हाला तुमच्या मराठी युट्यूब चॅनेलवर आमचं नविन प्रॅाडक्ट पहिल्यांदा लॅांच करायचंय आणि आम्ही तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रेयेचे तुम्हाला पैसे देऊ! तुम्ही तुमच्या गोड मराठी भाषेतच बोला हा त्यांचा आग्रह होता.’ असं त्या मेल मध्ये लिहल्याचं उर्मिलाने सांगितलं. आपल्या आवडत्या ब्रॅंण्डबरोबर काम करुन पैसे मिळवण्याचा आनंद उर्मिलाला आहेच पण तिला तिच्या या प्रवासाचा आनंद आणि अभिमान वाटतो असही ती सांगते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Its a pleasure to work with the brand that made me stand out today said actress urmila nimbalkar ttg