‘वीरे दी वेडिंग’ नंतर सुमित व्यासची पुन्हा एकदा वेब सीरिजकडे वाटचाल

‘परमनंट रुममेट्स’, ‘ट्रिपलिंग’ या वेब सीरिजमधून झळकलेला सुमित व्यास अनेकांच्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

sumit vyas
सुमित व्यास
वेब सीरिज आणि सुमित व्यास हे समीकरण जणू ठरलेलंच आहे. ‘परमनंट रुममेट्स’, ‘ट्रिपलिंग’ या वेब सीरिजमधून झळकलेला अभिनेता सुमित व्यास अनेकांच्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमान, शाहरुखप्रमाणे त्याच्या नावाभोवती असंख्य चाहत्यांचा गराडा नसला तरीही या अभिनेत्याने स्वत:चा असा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे हे नाकारता येणार नाही. नुकताच ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात झळकलेला हा अभिनेता आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘इट्स नॉट सिंपल’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये तो झळकणार आहे.

यामध्ये सुमित व्याससोबतच स्वरा भास्कर आणि पूरब कोहली यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. स्वरा या वेब सीरिजच्या पहिल्या भागातही झळकली होती. दानिश अस्लम दिग्दर्शित हा दुसरा सिझन वायकॉम १८ प्लॅटफॉर्म घेऊन येत आहे.

वाचा : या मराठमोळ्या अभिनेत्रीची ‘धडक’मध्ये वर्णी 

‘दुसऱ्या सिझनची कथाही अतिशय परिपक्व आहे. पहिल्या सिझनलाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या दुसऱ्या सिझनलाही आम्ही पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करू,’ अशी प्रतिक्रिया सुमित व्यासने दिली. अफलातून अभिनय कौशल्यामुळे सुमितच्या चाहत्यांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Its not that simple season 2 swara bhaskar sumeet vyas purab kohli

ताज्या बातम्या