काय म्हणाली लुलीया?
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत लुलीया म्हणाली, “कुठल्याही नात्यामध्ये दोन व्यक्ती एकमेकांबाबत काय विचार करतात हे जास्त महत्वाचे आहे. मी आणि सलमान आम्ही एकमेकांचा खूप आदर करतो. लग्नाचं म्हणाल तर माझी आई देखील अनेकदा मला हा प्रश्न विचारते. परंतु मला असं वाटतं की लग्न करणं जास्त महत्वाचं आहे की आनंदी असणं. अर्थात आनंदी असणं. कारण लग्न आणि आनंद यांचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे कोणासोबत लग्न करण्याचा अद्याप निर्णय मी घेतलेला नाही.” अशा आशयाचे उत्तर लुलीयाने दिले.
सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. जवळपास प्रत्येक मुलाखतीत त्याला हा प्रश्न विचारला गेला आहे. पूर्वी तो कतरिनासोबत लग्न करणार असं म्हटलं जात होतं. परंतु अशाच चर्चा आता लुलीयाच्या बाबतीतही सुरु आहे. लुलीया एक रोमानियन अभिनेत्री आहे. ‘फ्रेमा’ आणि ‘डान्सेस पेत्रू टिने’ या दोन रिअॅलिटी शोमध्ये तिने काम केले आहे. ती एक उत्तम डान्सरदेखील आहे.