सोशल मीडियावर अलीकडच्या काळात सेलिब्रिटींविषयी आक्षेपार्ह टिप्पणी किंवा त्यांची खिल्ली उडवण्याचे प्रकार वाढले आहेत. बहुतेकदा सेलिब्रिटी तो विषय अधिक ताणला जाऊ नये, यासाठी त्याकडे दुर्लक्ष करतात. हॉलिवूड ते बॉलिवूडपर्यंत अनेक कलाकारांना अशाप्रकारचे अनुभव आले आहेत. मात्र, काही सेलिब्रिटी शांत राहण्याऐवजी संबंधित युजरची चांगली खरडपट्टीही काढतात.
नुकताच ‘जागो मोहन प्यारे’ फेम अभिनेत्री श्रुती मराठे हिच्याबाबत अशीच एक घटना घडली. तिने याबाबतची एक पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली. यामध्ये श्रुतीने तिला आलेल्या अश्लिल मेसेजचा स्क्रीनशॉटही जोडलाय. हा फोटो पोस्ट करत तिने अशा चुकीच्या घटनांविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन इतरांना केलेय.
EXCLUSIVE : याआधी आमच्यासाठी भांडलात का? योगेश सोमण यांचा रवी जाधवांना सवाल
‘मी बऱ्याच काळापासून या मेसेजकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतेय. पण, आता मात्र मी त्याविषयी पुन्हा विचार केला. या माणसाची कृत्यं सर्वांसमोर उघड केली नाही तर, तो थांबणार नाही’, असे लिहित श्रुतीने त्या व्यक्तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचे हँडलही त्यात नमूद केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये असणारी दरी कमी झाली आहे. पण, या माध्यमाचा गैरवापर करणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या गोष्टींना आळा घालण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.
View this post on InstagramThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.