गेल्या काही वर्षांपासून कित्येक स्टारकिड्सने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. याच यादीमधील एक अभिनेता म्हणजे जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ. त्याने २०१४मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि स्वत:ची अॅक्शन हीरो म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. आता लवकरच करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ या चित्रपटात तो झळकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून टायगरची बहिण कृष्णा हीदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा होती. या चर्चांवर कृष्णाने दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

सध्या कृष्णा श्रॉफ सोशल मीडिया स्टार आहे. तिचे इंस्टाग्रामवर चार लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर जॅकी श्रॉफ यांनी त्यांची मुलगी कॅमऱ्यासमोर येण्यासाठी तयार नसल्याचं एका मुलाखतीत सांगितलं होतं. ‘कृष्णाने २ वर्ष चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाचं शिक्षण घेतले. त्यानंतर एक वर्ष किंडरगार्डनच्या मुलांना शिक्षण दिले आणि टायगरच्या ‘मुन्ना मायकल’ चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिलं. त्यानंतर एक स्पोर्ट अॅकेडमीमध्ये बास्केटबॉलचे प्रशिक्षण दिले’ असे पुढे जॅकी श्रॉफने म्हणाला.

‘जेव्हा गोष्ट अभिनयाची येते तेव्हा मी स्पष्टपणे सांगते की मी अभिनयासाठी बनले नाही. कॅमेऱ्याला सामोरं जाणाऱ्यांपैकी मी नाही. एखाद्या कामात जर मला रुची नसेल तर मी त्यात माझं १०० टक्के लक्ष देऊ शकत नाही. जर एखादं काम माझ्याने चांगलं होणार नसेल तर मी त्याला आधीच नकार देते. अभिनयाच्या बाबतीतही असंच आहे,’ असं कृष्णा म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.