सध्या लॉकडाउनमध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सलमान खानच्या फार्महाऊसवर वेळ घालवताना दिसत आहे. तेथे ती तिचे छंद जोपासताना दिसत आहे. तसेच आता जॅकलिनने ती दररोज करत असलेल्या कामांवर आधारित एक शॉर्ट फिल्म बनवली आहे. तिची ही फिल्म चाहत्यांना आवडली आहे.
नुकताच जॅकलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही शॉर्ट फिल्म शेअर केली आहे. ही शॉर्ट फिल्म सध्या ती सलमानच्या फार्म हाऊसवर काय काय कामे करते यावर आधारित आहे. ही फिल्म जॅकलिनने स्वत: शूट केली आहे. या ३. ४८ मिनिटांच्या शॉर्ट फिल्ममध्ये जॅकलिनने फार्महाऊसवर काम करणाऱ्या लोकांना देखील दाखवले आहे. तसेच जॅकलिन तेथे पुस्तक वाचते, हॉर्स रायडिंग करते, स्वत:चे कपडे धूवून वाळत घालताना दिसत आहे.
पाहा : सलमान राहत असलेला पनवेलचा आलिशान फार्महाऊस पाहिलात का?
तसेच या शॉर्ट फिल्मवरुन जॅकलिन तिचा संपूर्ण वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवत असल्याचे दिसत आहे. सलमानच्या फार्महाऊसवर कुत्रे, मांजर, कोंबड्या, म्हशी असल्याचे दिसत आहे. तसेच अनेक फळझाडे देखील आहेत. जॅकलिनचा हा व्हिडीओ सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.