आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवांपैकी महत्त्वाच्या व प्रतिष्ठित असलेला चित्रपट महोत्सव म्हणजे ‘व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’. यंदा रंगणाऱ्या या चित्रपट महोत्सवात तब्बल २० वर्षांनी एका मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’ या चित्रपटाची निवड झाली असून सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे केवळ मराठी चित्रपटसृष्टीच नव्हे, तर बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील चैतन्यवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चैतन्यचं अभिनंदन केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशय आणि विषय या दोन्हीबाबतीत सरस असलेल्या ‘द डिसायपल’ या चित्रपटाची या ७७ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत जॅकलीनने चैतन्यचं अभिनंदन केलं आहे.

दरम्यान, व्हेनिस शहरात भरणाऱ्या या महोत्सवात इ.स. १९३७ साली या चित्रपट महोत्सवात ‘संत तुकाराम’ हा भारतीय चित्रपट जगातील तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून सन्मानित झाला होता.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jacqueline fernandez supports the disciple marathi movie selected for venice film festival ssj
First published on: 08-08-2020 at 15:54 IST