आगामी ‘जलसा’ मराठी चित्रपटाच्या अधिकृत पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले. आता या सिनेमाचा सोशल मिडीयावर टिझरही प्रदर्शित केला गेला आहे. अमर आणि प्रेम या दोन तरुणांची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना जास्त वाव देऊन पसंतीच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेले असे हे अमर आणि प्रेम असतात. या सिनेमातील बाई वाड्यावर या हे गाणे या सिनेमाचे खास आकर्षण ठरणारे आहे.
विनोदीपट असलेला या सिनेमात भारत गणेशपुरे, सागर कारंडे, अरुण कदम, अभिजीत चव्हाण, आशुतोष राज, निखील वैरागर, शितल अहिरराव, सोनाली विनोद यांसारखे कलाकार दिसणार आहेत. ‘बाई वाड्यावर या’, या गाण्यातून मानसी नाईकचे नृत्यही पाहता येणार आहे. आनंद शिंदे यांनी हे गाणे गायले आहे. ती या सिनेमात पाहुणी कलाकार म्हणून दिसणार आहे. ‘जलसा… फिलींग गोंधळल्यावानी’ अशी हटके टॅग लाइनही या सिनेमाची आहे. आशुतोष एस राज आणि निखील वैरागर हे या सिनेमाचे लेखक, निर्माते आणि दिग्दर्शकही आहेत.