जपानमधील प्रसिद्ध अभिनेत्री सयाका कांडांचा (Sayaka Kanda Death) २२ व्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू झाला आहे. सयाका होक्काईडो बेटावरील एका हॉटेलमध्ये थांबली होती. याच हॉटेलच्या २२ व्या मजल्यावरुन खाली पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. १८ डिसेंबरला रक्तबंबाळ अवस्थेत हॉटेलच्या बाहेर तिचा मृतदेह आढळला. सयाकाच्या मृत्यूनंतर तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

३५ वर्षीय सयाका हॉटेलमधील २२ व्या मजल्यावर वास्तव्यास होती. रिपोर्ट्सनुसार तिथूनच खाली पडून तिचा मृत्यू झाला आहे. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र डॉक्टर अथक प्रयत्न करुनही तिला वाचवू शकले नाहीत. स्थानिक प्रसारमाध्यमांनी मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

कोण आहे सयांका कांडा –

सयाका एक जपानी अभिनेत्री आणि गायक होती. अभिनेता Masaki Kanda आणि पॉप गायक Seiko Matsuda यांची ती एकुलती एक मुलगी होती. सयाकाने Disney च्या Frozen चित्रपटाच्या सीरिजमध्ये डबिंग केलं होतं, ज्यामुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी सध्या तिच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. सध्या ही आत्महत्या असल्याचं ग्राह्य धरत तपास केला जात आहे. मात्र यामागे घातपात असल्याची शक्यताही नाकारण्यात आलेली नाही. सयाका आत्महत्या करु शकते यावर तिला ओळखणारे तसंच चाहते विश्वास ठेवण्यास तयार नाहीत.