७४ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभरात साजरा करण्यात आला. सध्या देशावर करोना विषाणूचं सावट आहे, त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने हा दिवस साजरा करण्यावर देशातील नागरिकांचा भर होता. परंतु, या काळातही नागरिकांमध्ये दरवर्षीप्रमाणेच तितक्याचं आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं. यात अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यात जावेद अख्तर यांनीदेखील ट्विट करत शुभेच्छा दिल्या. मात्र, नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.

“माझ्या समस्त भारतीय बंधू-भगनींनो, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपलं स्वातंत्र्य असंच अबाधित राहू दे”, असं ट्विट जावेद अख्तर यांनी केलं. मात्र त्यांचे हे ट्विट पाहून नेटकऱ्यांनी त्यांनी ट्रोल केलं. विशेष म्हणजे त्यांनी रात्री उशीरा ट्विट केल्यामुळे त्यांच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे.

‘चला, निदान रात्री ११ वाजता का होईना पण तुम्हाला ही पोस्ट लिहावीशी वाटली’, असं एका नेटकऱ्याने म्हटलं.तर, ‘यांचा स्वातंत्र्य दिवस काल होता त्यामुळे कदाचित ते त्याच विचारांमध्ये होते आणि आता जागे झाले आहेत’, असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

 

 

दरम्यान, ‘तुम्ही आणि फरहान प्रत्येक गोष्टीविषयी इतक्या उशीरा का भाष्य करता. नशीब २-४ दिवसांनी नाही शुभेच्छा दिल्या’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.