मी महाराष्ट्रात राहतो आणि मुंबई माझी कर्मभूमी आहे. मी जरी दिल्लीचा असलो तरी माझ्यासहित बहुतांश कलाकारांना मोठे करण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. जगातील सर्वोत्तम गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची हिंदी आणि मराठी गाणी ऐकून मी मोठा झालो. दयाघना.., मेंदीच्या पानावर ही माझी आवडती मराठी गाणी आहेत. त्यामुळे मला जेव्हा जेव्हा मराठी गाणं गाण्यासाठी बोलावलं जातं तेव्हा मी खूश असतो. पण तिथे जाण्यापूर्वी मी गीताचे संपूर्ण बोल, शुद्ध उच्चारण कसे होतील याकडे लक्ष देतो आणि त्यासाठी मराठी गाणी आवर्जून ऐकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेव्हा मी ते गाणं रेकॉर्डिगनंतर ऐकतो तेव्हा मला खूप अभिमान वाटतो की मीपण मराठी गाणं गायलंय! या चित्रपटात मी ‘शोना रे’ हे गाणं एकटं गायलो आणि ‘जवळ येना जरा’ हे गाणं गायिका श्रेया घोषाल सोबत गायलंय. या चित्रपटात आशाताईंनीही एक गाणं गायलंय, असं गायक जावेद अली ‘व्हॉट्सप लव्ह’ या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शन सोहळ्यात म्हणाला.

‘व्हॉट्सप लव्ह’ या चित्रपटाची कथा व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडू शकते किंबहुना घडलीही असेल. त्यामुळे प्रत्येक व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्या व्यक्तिसाठी हा सिनेमा मार्गदर्शक ठरणार असे बोलले जात आहे. राकेश बापट, अनुजा साठे, पर्शियन अभिनेत्री सारेह फर, पल्लवी शेट्टी, अनुप चौधरी, अनुराधा राजाध्यक्ष या कलाकारांनी चित्रपटात मुख्य भूमिका वठविल्या आहेत. १२ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Javed ali mpg
First published on: 29-06-2019 at 23:11 IST