बॉलिवूडमध्ये आजवर असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कलाविश्वामध्ये सक्रिय नाहीत. मात्र तरीदेखील ते सतत सोशल मीडियावर चर्चेमध्ये येत असतात. यामध्येच अभिनेता जावेद जाफरीची लेक अलाविया हीदेखील आहे. अलाविया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगत आहे. मात्र तिच्या पदार्पणापूर्वीच तिच्या सौंदर्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगू लागल्या आहेत. विशेष म्हणजे ती सौंदर्यामध्ये अनेक लोकप्रिय अभिनेत्रींना मात देत असल्याचं दिसून येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अलाविया सध्या न्युयॉर्कमध्ये शिक्षण घेत असून तिला आताच बॉलिवूडमधून अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या आहेत. मात्र अद्यापतरी तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा विचार केलेला नाही. अलाविया इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोट शेअर करत असते. त्यामुळे ती सतत चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
दरम्यान, अलावियाने धीरूभाई अंबानी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असून जान्हवी कपूर तिची जवळची मैत्रीण आहे. अलावियाच्या भावाने मिजान जाफरीने ‘मलाल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.