मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना यावर्षीचा मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. विष्णुदास भावे गौरवपदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ११,००० रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या मराठी रंगभूमी दिनी म्हणजे ५ नोव्हेंबरला सांगली येथे या पुरस्काराचे वितरण होईल. या समारंभात ९६वा व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नाटककार यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदीर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक केळकर, कार्यवाह वि.ज. ताहनकर, कोषाध्यक्ष मेधा केळकर, संचालक बलदेव गवळी, विलास गुप्ते, प्राचार्य भास्कर ताम्हनकर उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वयाच्या ८० व्या वर्षीही जयंत सावरकर आपल्या तब्येतीची योग्य ती काळजी घेतात. एक कलाकार म्हणून सर्वसामान्यांपेक्षा तब्येतेची थोडी जास्तच काळजी घ्यावी लागते. इतकेच नव्हे तर या वयातही ते अनेक ठिकाणी नाटकांचे प्रयोग त्याच जोषात करतात. नाटकानंतर प्रत्येक कलाकाराबरोबर ते नाटकाबाबतची चर्चाही करतात. नुकतीच त्यांच्या अभिनय कारकिर्दीला ६० वर्ष पूर्ण झाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant sawarkar honour with vishnudas bhave award
First published on: 12-10-2016 at 20:33 IST