दूरचित्रवाहिनीवर महामालिकांचा इतिहास रचणारी एकता कपूर आता ऐतिहासिक मालिकांच्या निर्मितीक डे वळली आहे. खास बालाजी टेलिफिल्म्सचा परीसस्पर्श असलेली ‘जोधा अकबर’ ही ऐतिहासिक मालिका लवकरच झी टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे. मात्र, आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित जोधा अकबर या चित्रपटाशी मालिके चा काहीही संबंध नाही, दोन्हीच्या आशयांमध्ये फरक असल्याचे एकताने स्पष्ट केले आहे.
आशुतोष गोवारीकरच्या ‘जोधा अकबर’मध्ये अकबर आणि जोधाबाई यांची प्रेमकथा रंगवण्यात आली होती. एकताच्या ‘जोधा अकबर’मध्ये या प्रेमकथेला फाटा देण्यात आला आहे. ही मालिका बादशाह अकबर याच्या राजकीय प्रवासावर भर देणारी आहे. जून महिन्यात ही मालिका झी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. या मालिकेत बादशाह अकबराची भूमिका रजत टोकस तर परिधी शर्मा ही अभिनेत्री जोधाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अश्विनी काळसेकर महामांगाच्या भूमिकेत दिसणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st May 2013 रोजी प्रकाशित
एकताची ‘जोधा अकबर’ झी टीव्हीवर
दूरचित्रवाहिनीवर महामालिकांचा इतिहास रचणारी एकता कपूर आता ऐतिहासिक मालिकांच्या निर्मितीक डे वळली आहे. खास बालाजी टेलिफिल्म्सचा परीसस्पर्श असलेली ‘जोधा अकबर’ ही ऐतिहासिक मालिका लवकरच झी टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे.
First published on: 31-05-2013 at 12:35 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jodha akbar serial by ekta kapur on zee tv