टेलिव्हिजन विश्वात नावारुपास आल्यानंतर बऱ्याच कलाकार मंडळींनी त्यांचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. अशाच कलाकारांच्या यादीत आता अभिनेत्री मौनी रॉयचाही समावेश झाला आहे. बऱ्याच काळापासून मौनीला सलमान खान त्याच्या चित्रपटातून लॉन्च करणार असल्याचं म्हटलं जात होतं. अशाही चर्चा रंगल्या होत्या की, ही अभिनेत्री खिलाडी अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मौनी कोणत्या अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार यावर प्रश्नचिन्ह कायम असलं तरीही ती बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आतापर्यंतच्या कारकिर्दीत आज मौनी ज्या वळणावर उभी आहे, त्या ठिकाणाहून मागे वळून पाहिलं असता तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाचं सुरेख चित्र पाहायला मिळतं. मौनीने २००७ मध्ये एकता कपूरच्या ‘क्यों की सास भी कभी बहू थी’ या मालिकेपासून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. या मालिकेनंतर तिने काही रिअॅलिटी शोमध्येही सहभागी होत प्रेक्षकांची मनं जिंकली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journey of naagin actress mouni roy journey from television actress to bollywood celebrity
First published on: 24-05-2017 at 18:11 IST