बॉलिवूड वर्तुळात आजकाल स्टार किड्सचीच चर्चा ऐकायला मिळते. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर असो किंवा सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, प्रसारमाध्यमांचे लक्ष ते नेहमीच वेधून घेतात. त्यांचा स्टायलिश लूक, त्यांची फॅशन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. मात्र, असेही काही स्टार किड्स आहेत, जे नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहतात. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री जुही चावलाची मुलगी जान्हवी.
जुहीने १९९५ मध्ये व्यावसायिक जय मेहतासोबत लग्न केलं. त्यांना १७ वर्षांची मुलगी जान्हवी आणि १४ वर्षांचा मुलगा अर्जुन आहे. जुहीने तिच्या दोन्ही मुलांना लाइमलाइटपासून दूर ठेवले. कोणत्याच बॉलिवूड पार्टीत किंवा कार्यक्रमांमध्ये जान्हवी आणि अर्जुन कधीच दिसत नाहीत.
PHOTOS : पतीच्या वाढदिवसासाठी श्रीदेवीने आखला खास बेत
जान्हवीचं मुंबईत शिक्षण झालं. पुढील शिक्षणासाठी तिला लंडनला पाठवण्यात आलं. जान्हवीने शाळेत पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवलं होतं, तेव्हा जुहीने तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तिच्या मुलांना चित्रपटांमध्ये काही रस नाही, हे जुहीने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. जान्हवीला लेखिका व्हायची इच्छा आहे. सोशल मीडियावरही ती सक्रीय नसते. सामान्य जीवन जगायला तिला आवडत असल्याचं जुहीने सांगितलं.