दक्षिण कोरियाची लोकप्रिय गायिका पार्क बो राम हिचं अवघ्या ३० व्या वर्षी निधन झालं आहे. तिची एजन्सी एक्सएएनएडीयू एंटरटेनमेंटने एक निवेदन प्रसिद्ध करत तिच्या निधनाची माहिती दिली. गुरुवारी ११ एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूच्या कारणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे, असं निवेदनात म्हटलं आहे.

एक्सएएनएडीयू एंटरटेनमेंटने निवेदनात लिहिलं, “आम्ही एक दुर्दैवी बातमी देतोय. पार्क बो राम हिचं ११ एप्रिल रोजी रात्री उशिरा अचानक निधन झालंय. एक्सएएनएडीयू एंटरटेनमेंटचे सर्व कलाकार आणि कर्मचारी तिच्या मृत्यूबद्दल शोकाकुल आहेत. तिच्या कुटुंबाशी चर्चा करून नंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मृत्यूच्या कारणाचा सध्या पोलीस तपास करत आहेत.”

Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
drugged woman high voltage drama caught on camera strips naked demands sex at jamaica airport video viral
नग्नावस्थेत महिलेचा विमानतळावर धिंगाणा! नशेत तिच्याकडून शरीरसंबंधाची मागणी; VIDEO व्हायरल
Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…

२०१० मध्ये सुपरस्टार K2 या शोमध्ये झळकल्यानंतर पार्क बो रामला लोकप्रियता मिळाली. मग तिने २०१४ मध्ये ‘ब्यूटिफूल’ या गाण्याद्वारे पदार्पण केलं. ‘सॉरी’, ‘प्रिटी बे’, ‘डायनॅमिक लव्ह’, ‘सेलेप्रिटी’ ही तिची काही गाजलेली लोकप्रिय गाणी आहेत. याशिवाय तिने काही कोरिअन ड्रामासाठीही गाणी गायली होती.

अवघ्या २० कोटींचं बजेट अन् कमावले २२५ कोटी, एकही अभिनेत्री नसलेला ‘हा’ सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित

पार्क बो रामला या क्षेत्रात १० वर्षे झाली आहेत, यानिमित्ताने ती कार्यक्रमाचं आयोजन करत होती, अशी माहिती समोर आली आहे. पण त्यापूर्वीच तिचं निधन झालं. निधनानंतर तिचे जगभरातील चाहते तिला श्रद्धांजली वाहत आहेत.