‘एजंट विनोद’मधील ‘पुंगी’ किंवा ‘कॉकटेल’मधील ‘सेकंड हॅण्ड जवानी’ गाणे तुम्हाला आठवतंय का? जर तुम्हाला वाटत असेल की अभिनेता सैफ अली खानचा अतरंगी अवतार केवळ याच गाण्यांमध्ये पाहायला मिळाला तर आता आलेलं त्याचं नवं गाणं नक्कीच वेड लावणारे आहे. आगामी ‘कालाकांडी’ चित्रपटातील नवे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले.
वाचा : जाणून घ्या, क्रिकेटपटू क्रुणाल पांड्याच्या होणाऱ्या पत्नीबद्दल
रॉकिंग ट्रॅक असलेलं ‘स्वॅगपूर का चौधरी’ हे गाणं अक्षय वर्माने लिहिलं असून त्यानेच गायले आहे. तर समीर उद्दिनने यास संगीत दिले आहे. चित्रपटातील सर्वच कलाकार या गाण्यावर ठेका धरताना दिसतात. हे गाणं तुम्हाला एका वेगळ्या जगात जाण्यास भाग पाडते. मुंबईतील विविध भागांमध्ये राहणाऱ्या आणि एकमेकांना कधीही पूर्वी न भेटलेल्या सहा व्यक्तींचे आयुष्य केवळ १२ तासांत एकमेकांशी कसे जोडले जाते यावर चित्रपटाची कथा आधारित आहे.
वाचा : जाणून घ्या, सलमान-कतरिनाच्या ‘टायगर जिंदा है’ ची कमाई
सिनेस्तान फिल्म कंपनी आणि फ्लाइंग युनिकॉर्नची निर्मिती असलेल्या ‘कालाकांडी’ चित्रपटात सैफसोबत दीपक डोब्रियाल, विजय राझ, कुणाल रॉय कपूर, सोभिता धुलिपाला, अक्षय ओबरॉय, ईशा तलवार, शहनाझ ट्रेजरी, शिवम पाटील, अमायरा दस्तूर आणि नील भूपालम यांच्याही भूमिका आहेत.