‘त्या घटनेनंतर मला पॅनिक अटॅक येऊ लागले’, ‘कबीर सिंग’मधील अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनुभव सांगितला आहे.

‘कबिर सिंग’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री निकिता दत्ता ही अतिशय लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडियावर सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असते. आता निकिताने तिच्यासोबत घडलेल्या एक भयानक किस्सा सांगितला आहे.

निकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने संध्याकाळी वॉकला गेली असताना घडलेली घटना सांगितली आहे. ती फिरत असताना अचानक दोन चोर गाडीवर आले आणि तिच्या हातातील फोन खेचून घेऊन गेले. या घटनेनंतर निकिताला धक्का बसला.
आणखी वाचा : आमिर खानने चक्क ‘KGF २’च्या निर्मात्यांची आणि अभिनेता यशची मागितली माफी, जाणून घ्या कारण

‘मला तुमच्या सर्वांसोबत एक घटना शेअर करायची आहे. गेल्या काही दिवसांपासून मी कठीण काळातून जात आहे. मी एकाच घटनेविषयी विचार करत आहे. मी वांद्रे येथील रस्त्यावर वॉकसाठी गेले होते. तेव्हा ७ वाजले होते. अचानक दोन चोर मागून आले आणि त्यांनी माझ्या कपाळावर मारले जेणे करुन माझे लक्ष विचलित होईल. त्यानंतर त्यांनी माझ्या हातातील फोन खेचून घेतला. मला काही कळण्यापूर्वीच ते तेथून पळून गेले’ असे निकिताने पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुढे ती म्हणाली, ‘३ ते ४ सेकंद मला काय झाले कळाले नाही. माझ्या आजूबाजूला असणारी माणसे खूप चांगली होती. त्यांनी माझी मदत केली. या घटनेनंतर मला पॅनिक अटॅक येऊ लागले. माझे नशीब खूप चांगले आहे की त्यांनी मला प्यायला पाणी दिले. त्यानंतर मी वांद्रे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. लोकांना जागरुक करण्यासाठी मी ही पोस्ट लिहिली आहे. मला आशा आहे अशी घटना पुन्हा कुणासोबत घडणार नाही.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kabir singh actress nikita dutta phone snatch by robber in mumbai actress is still in shocked avb

ताज्या बातम्या