अभिनेत्री काजोलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती चालता चालता अचानक जमिनीवर घसरून पडल्याचं पाहायला मिळत आहे. अंगरक्षकाच्या मदतीने ती सांभाळण्याचा प्रयत्न करते, पण उंच टाचाच्या सँडलमुळे ती पडते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतल्या एका मॉलमधील दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी काजोल गेली होती. त्यावेळी हा प्रसंग घडला. तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने काजोलला टिपण्याचा प्रयत्न करत असतानाच या व्हिडिओमध्ये ती पडल्याचंही कैद झालं. उंच टाचाच्या सँडलमुळे काजोलचा तोल गेला आणि ती पडली. हा प्रसंग हसण्यावारी घेऊन ती पुढे निघून गेली.

Bigg Boss Marathi : मेघा, सई आणि रेशममध्ये उडाली वादाची ठिणगी?

‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटात काजोल सतत धडपडताना दिसते. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून अनेकांना काजोलच्या त्याच भूमिकेची आठवण होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kajol fell down on floor in the mall watch this video
First published on: 22-06-2018 at 13:40 IST