करण जोहरसोबत असलेल्या काजोलच्या वादाबद्दल तर आता सर्वांनाच कळले आहे. सध्या ती या विषयावर काहीही बोलत नसली तरी करण मात्र या प्रकरणात खुल्याने बोलताना दिसत आहे. करणच्या आत्मचरित्रात मात्र त्याने यासंदर्भात सविस्तर लिहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

[jwplayer xAgaXIEY]

सध्या काजोल तिच्या तामिळ सिनेमाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे, जवळपास २० वर्षानंतर ती पुन्हा एकदा तामिळ सिनेमात दिसणार आहे. व्हिआयपी २ या सिनेमातून ती तामिळ सिनेसृष्टीत पुनरागमन करणार आहे. सुपरस्टार धनुष हा या सिनेमाचा मुख्य अभिनेता आहे तर धनुषची बायको आणि रजनीकांतची मुलगी सौंदर्या ही हा सिनेमा दिग्दर्शित करते आहे.

सुमारे एक महिन्यापूर्वी काजोलनेच ती या सिनेमात काम करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतरच या सिनेमाशी निगडीत तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर येत होते. आता काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीमध्ये तिच्यासोबत धनुष आणि सौंदर्याही आहेत. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, खूप काम आणि कदाचित थोडीफार मजा. ‘व्हिआयपी’ या सिनेमाचा ‘व्हिआयपी २’ हा सिक्वल आहे. या सिनेमाची सहनिर्मिती धनुषची वन्डरबार ही निर्मिती संस्था करत आहे. काजोल तब्बल दोन दशकांनंतर तमिळ सिनेमात पदार्पण करत आहे.

या सिनेमात काजोल सिंगल मदर म्हणून तर दिसणार आहेच. पण त्याव्यतिरिक्त ती खलनायिकेची भूमिकाही यात साकारत असल्याचे कळते. या सिनेमाची कथा एका खूनावर आधारित आहे. काही वर्षांपूर्वी राजीव राय यांच्या गुप्त सिनेमात काजोलने एका खून्याची व्यक्तिरेखा साकारली होती. या सिनेमात तिच्यासोबत बॉबी देओल आणि मनिषा कोयराला यांच्यादेखील भूमिका होत्या.

[jwplayer KEeA17Yq]

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kajol selfie with vip 2 stars dhanush and soundarya
First published on: 21-01-2017 at 16:48 IST