या अभिनेत्याच्या वडिलांनी आत्महत्या करण्यापूर्वी केलेली पत्नी-मुलीची हत्या

काजोलच्या हिरोची भूमिका साकारलेला कमल सदाना इतकीच आता त्याची ओळख आहे.

kamal sadanah, kajol
अभिनेता कमल सदाना, अभिनेत्री काजोल

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आपले नशीब आजमवतात, मात्र प्रत्येकालाच त्यात यश मिळते असे नाही. ९० व्या दशकातील ‘बेखुदी’ या चित्रपटात अभिनेत्री काजोलसोबत भूमिका साकारलेल्या कमल सदानाला खूप कमी लोक ओळखतात. किंबहुना काजोलच्या हिरोची भूमिका साकारलेला कमल सदाना इतकीच आता त्याची ओळख आहे. कमलच्या वैयक्तिक आयुष्यातदेखील अनेक समस्या होत्या. त्यासंदर्भात आश्चर्यचकित करणाऱ्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. २१ ऑक्टोबर १९९० रोजी कमलच्या विसाव्या वाढदिवशी त्याच्या वडिलांनी कमलची आई सईदा खान आणि बहिण नम्रताची हत्या केली होती.

कमलने दिलेल्या माहितीनुसार त्याचे वडील ब्रिज सदाना यांनी त्याच्यावरही गोळी झाडली होती मात्र कमल कसाबसा वाचला. हत्येच्या घटनेआधी ब्रिज यांचं पत्नीसोबत भांडण झालं होतं. माझ्या आई- वडिलांमध्ये नेहमीच भांडणे होत होती, आणि माझ्या वाढदिवशी त्या भांडणाचे एक वेगळेच रुप मी पाहिले होते, असं कमल म्हणाला. या घटनेबाबत सांगताना तो पुढे म्हणाला की, ‘दारूच्या नशेत असलेल्या माझ्या वडिलांनी बंदुकीची गोळी आधी आई आणि नंतर माझ्या बहिणीवर गोळी झाडली. त्या दोघींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर वडील बेडरूममध्ये गेले आणि त्यांनी स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली.’

PHOTO : आर माधवनचा हॉट सेल्फी पाहिलात का?

ही सर्व घटना अभिनेता कमल सदानाच्या डोळ्यांसमोर घडल्याने त्याच्या मनावर याचा खोलवर परिणाम झाला. घटनेनंतर कमलचे समुपदेशनदेखील करावे लागले. ही भयानक घटना आजही आठवल्यास अंगावर काटा येतो असं कमल म्हणतो. त्याच्या वडिलांनी असं का केलं, हा प्रश्न आजही पडत असल्याचं कमल सांगतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kajols co actor kamal sadanah father killed his mother and sister