“अंध भक्तांच्या ज्ञानावर विश्वास ठेवू नका”; अभिनेत्याचा मोदी समर्थकांना टोला

“मी मोदी भक्त नाही गैरसमज दूर करा”; अभिनेत्याचा समर्थकांना टोला

नरेंद्र मोदी ( संग्रहीत छायाचित्र )

अभिनेता कमाल आर. खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशातील राजकारण अशा विविध विषयांवर तो रोखठोकपणे आपली मतं मांडतो. यावेळी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांवर निशाणा साधला आहे. मोदी भक्तांच्या ज्ञानावर कधीही विश्वास ठेवू नका असा टोला त्याने लगावला आहे.

अवश्य पाहा – “तू तर मर्यादा ओलांडलीस”; नियाचे हॉट फोटो पाहून अभिनेता घायाळ

अवश्य पाहा – केला कहर अन् झाले ट्रोल; २०२०मध्ये सर्वाधिक टीका झालेले सेलिब्रिटी

“डियर भक्तांनो, मी आर्टिकल ३७०, जीएसटी, सीएए, बाबरी मस्जिद, आणि ट्रिपल तलाक या मुद्द्यांवर मोदींना पाठिंबा दिला. पण लॉकडाउन, नोटबंदी आणि सुधारित शेतकरी कायदा या प्रकरणी मी त्यांचा विरोध करतोय. मी योग्य ठिकाणी पाठिंबा देतो आणि अयोग्य ठिकाणी विरोध करतो. कारण मी अंधभक्त नाही. भक्तांच्या ज्ञानावर कधीही विश्वास ठेवू नका.” अशा आशयाचे दोन ट्विट्स करुन केआरकेने मोदी समर्थकांवर टीका केली आहे. त्याचे हे ट्विट्स सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

अवश्य पाहा – सोज्वळ सुनेचा बिकिनी अवतार; हॉट फोटोशूटमुळे चाहते अवाक

अवश्य पाहा – आकाशातील परी जमिनीवर…; सुरभीचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते अवाक

यापूर्वी केआरकेने शेतकरी आंदोलनावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. “अन्नदाता शेतकरी नाही राहिला तर काय माती आणि दगड खाऊन जिवंत राहणार आहात का? हात जोडून आपल्या अन्नदाताची माफी मागा. आम्ही शेतरकरी होतो, आहोत आणि शेवटपर्यंत शेतकरीच राहू. तुम्ही आम्हाला देशद्रोही म्हणा किंवा दहशतवादी. लक्षात ठेवा मत मागायला याल तेव्हा आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवू.” अशा आशयाची ट्विट्स त्याने केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kamaal r khan farmers protest live updates narendra modi bhakt mppg

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या