चेन्नई: ‘सदमा’, ‘चाची ४२०’, ‘दशावतार’ यांसारख्या चित्रपटांतून दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या अभिनेता कमल हसनला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार्यालयाच्या पायऱ्या उतरताना पाय घसरुन पडल्यामुळे कमल हसन यांच्या पायाला काहीशी दुखापत झाली असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘बुधवारी रात्री कार्यालयाच्या पायऱ्यांवरुन जात असताना अचानक कमस हसन यांचा तोल गेला आणि ते खाली पडले ज्यामुळे त्यांच्या पायाला किरकेळ दुखापत झाली आहे. त्यांना सध्या ‘अपोलो’ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांची प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे काहीच कारण नाही’, अशी माहीती हसन यांच्या निकटवर्तीयांनी सुत्रांना दिली आहे.
कमल हसन सध्या ‘शाबाश नायडू’ या चित्रपटाच्या कामात व्यस्त असून हा चित्रपट तीन भाषांमध्ये बनणार आहे. सध्या रुग्णालयात असलेले कमल हसन यांचा या आठवड्याअखेरीस ‘लंडन इंडियन फिल्म फेस्टिवल’ला जाण्याचा बेत होता, जिथे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार होते. पण या दुखापतीमुळे या कार्यक्रमाला त्यांना हजेरी लावता येणार नाही असेच दिसत आहे. या दुखापतीतून सावरल्यानंतर कमल हसन स्वत:च दिग्दर्शन करणाऱ्या ‘शाबाश नायडू’ या चित्रपटाच्या कामात पुन्हा रुजू होणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jul 2016 रोजी प्रकाशित
अभिनेता कमल हसन रुग्णालयात दाखल
कमल हसन यांच्या पायाला काहीशी दुखापत
Written by सायली पाटील

First published on: 14-07-2016 at 09:53 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamal haasan hospitalised