नुकतेच ‘कामसूत्र ३डी’ या चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले होते. पोस्टरमध्ये झिरझिरत साड्यांमधून अंगप्रदर्शन करणा-या शर्लिन चोप्राचा हा चित्रपट ब दर्जाचा म्हणजेच पॉर्न चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, या चित्रपटासंबंधी चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे दिग्दर्शक रुपेश पॉलने म्हटले आहे.
रुपेश म्हणाला की, शर्लिन चोप्राला मुख्य भूमिकेत घेतल्याने चित्रपटाला कमी दर्जाचे म्हटले जात आहे. पण, आम्ही सध्या उपलब्ध असणाऱ्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करुन आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट बनवला आहे. जगभरात या चित्रपटाची ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘क्रिश ३’ यांच्यापेक्षाही दुप्पट किंमतीत पूर्व विक्री करण्यात आली आहे.
‘कामसूत्र ३डी’ला ८६व्या ऑस्कर पुरस्कारासाठी बेस्ट मोशन पिक्चर, ओरिजनल स्कोर आणि ओरिजनल साँग या तीन विभागांत नामांकने मिळाली आहेत.
ऑस्कर पुरस्कारांच्या नामांकनाची घोषणा १६ जानेवारी, २०१४ रोजी लाईव्ह केली जाणार आहे. तर पुरस्कार वितरण सोहळा मार्चमध्ये होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2013 रोजी प्रकाशित
शर्लिनचा ‘कामसूत्र ३डी’ हा ‘ब दर्जा’चा पॉर्न चित्रपट नाही
नुकतेच 'कामसूत्र ३डी' या चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले होते.

First published on: 23-12-2013 at 11:55 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamasutra 3d misread as a b grade soft porn rupesh paul