मी ‘टाईमपास’ रोमान्ससाठी तयार- कंगना

टाईमपास रोमान्स करण्यावर विश्वास असून लिव्ह इन रिलेशनशिपलाही माझी हरकत नाही, असे बेधडक मत बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतने मांडले आहे.

टाईमपास रोमान्स करण्यावर विश्वास असून लिव्ह इन रिलेशनशिपलाही माझी हरकत नाही, असे बेधडक मत बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतने मांडले आहे. लिव्ह इन रिलेशनशिपवर आधारित कंगनाचा ‘कट्टी-बट्टी’ चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा पहिला ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्यावेळी कंगना बोलत होती. जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत टाईमपास म्हणून डेटवर जाता तेव्हा तुमच्या मनात लग्नाचा विचार नसतो कारण, तुमच्यात नातेसंबंधांची जाणीव नसते. मी टाईमपाससाठी रोमान्स करण्यासाठी तयार आहे, असे बेधडक मत कंगनाने व्यक्त केले.
समोरचा व्यक्ती तुमच्याशी कसे वागतो यावर अवलंबून असते. जर दोघांचाही एकमेकांवर विश्वास असेल तर त्यांनी आपले नाते आणखी पुढे नेण्याची गरज आहे, असे म्हणत कंगनाने लिव्ह इन रिलेशनशिपविषयीचे समर्थन केले.
‘क्वीन’ आणि ‘तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स’च्या घवघवीत यशानंतर कंगना आता ‘कट्टी-बट्टी’ या वेगळ्या ढंगातील चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कंगना लव्ह इन रिलेशनशिपवर विश्वास ठेवणाऱया मुलीची भूमिका साकारताना दिसते. कंगनासोबत अभिनेता इमरान खान सहकलाकाराच्या भूमिकेत आहे. इमरान खान कंगनाच्या प्रेमात पडतो पण, कंगना सुरूवातीलाच टाईमपास प्रेमाची अट घालते. अखेर इमरान कंगनाचे प्रेम मिळवण्यासाठी टाईमपास प्रेमाची अट मान्य करतो. यानंतर दोघांच्याही आयुष्यात घडणारे चढउतार आणि त्यातून दोघांवर होणारे भावनिक परिणाम यावर चित्रपटाची कथा आधारलेली असल्याचे ट्रेलर पाहता सांगता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kangana ranaut i am open to timepass romance and live in relationship

ताज्या बातम्या