कंगना रनौत बॉलिवूडमधील अष्टपैलू कलाकारांपैकी एक म्हणून ओळखली जाते. तिने २००६ साली ‘गँगस्टर’ या चित्रपटातून एक अभिनेत्री म्हणून आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात केली. आणि आज १५ वर्षानंतर ती एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून चर्चेत आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगनानेच केले होते. यानंतर आता ती चित्रपट निर्मिती या क्षेत्रातही आपले हात आजमावून पाहाणार आहे. यासाठी तिने ‘मणिकर्णिका फिल्‍म्‍स’ या नावाने एका निर्मिती संस्थेची सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या नव्याकोऱ्या निर्मिती संस्थेच्या कार्यालयासाठी कंगनाने मुंबईतील पाली हिल येथील अत्यंत महागड्या क्षेत्रात एक तीन मजली इमारत विकत घेतली आहे. या इमारतीचे फोटो आणि व्हिडीओ कंगनाची बहिण रंगोली चंडेल हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. “१० वर्षांपूर्वी पाहिलेले ते स्वप्न आज पूर्ण झाले. कुठल्याही पुरस्कार सोहळ्यांमध्ये किंवा लग्नांमध्ये न नाचता व कुठल्याही चिंधी ब्रँड्सच्या जाहिराती न करता कंगनाने हे यश संपादित केले.” अशा आशयाचे ट्विट करुन रंगोलीने आपल्या बहिणीचे तोंडभरुन कौतुक केले आहे. कंगनाचे हे नवे कार्यालय तिचा भाऊ अक्षित सांभाळणार आहे.

रंगोलीने शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. शेकडो नेटकऱ्यांनी कंगनाला तिच्या या नव्या इंनिंगसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut inaugurates her production house mppg
First published on: 15-01-2020 at 15:49 IST