कंगनाला असतील कामं पण तिला हे विसरून चालणार नाही की ती या प्रकरणात आरोपी आहे, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने सुनावलं आहे. जावेद अख्तर यांच्या बदनामी प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या दरम्यान कोर्टाने अभिनेत्री कंगना रणौतला सुनावलं आहे.


न्यायदंडाधिकारी खान यांनी नमूद केलं की, “आजपर्यंत, कंगना विशिष्ट गुन्ह्याचा तपशील तयार करण्यासाठी हजर झाली नाही, परंतु ही बाब विशेषत: गुन्ह्याचे तपशील तयार करण्यासाठी तिच्या हजर राहण्यासाठी ठेवण्यात आली होती. याउलट, तिला आवडेल त्या पद्धतीने ती खटल्याच्या सुनावणीसाठी स्वतःच्या अटी ठरवत आहे. मान्य आहे की, कंगना कायमस्वरूपी सूट मागू शकत नाही. आरोपीला कायद्याची स्थापित प्रक्रिया आणि तिच्या जामीन बॉन्डच्या अटी व शर्तींचे पालन करावे लागते. यात शंका नाही की, एक सेलिब्रिटी असल्याने, तिला व्यावसायिक असाइनमेंट असतील पण ती या प्रकरणात आरोपी आहे हे विसरू शकत नाही.”

Syedna Mufaddal Saifuddin dawoodi bohra community
आठ वर्षं सुनावणी, वर्षभराची प्रतीक्षा..अखेर दाऊदी बोहरा उत्तराधिकारी वादावर न्यायालयाचा मोठा निकाल!
nagpur court marathi news, nagpur petitioner donate 25 thousand
दे दान सुटे गिऱ्हाण! कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावली अनोखी शिक्षा; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
navneet rana and congress candidate rashmi barve
एकाच मुद्यावरील न्यायालयाच्या निर्णयाने एक निवडणूक रिंगणात तर दुसरी रिंगणाबाहेर


न्यायदंडाधिकाऱ्यांनी सांगितलं की रेकॉर्डनुसार, कंगना फक्त दोन वेळा या प्रकरणाच्या सुनावणीसाठी हजर होती – एकदा केस बोर्डात घेतल्याच्या वेळी आणि दुसरी कोर्टावर पक्षपातीपणाचे आरोप केल्याबद्दल. “आजपर्यंत कंगना तिच्यावर लावलेल्या आरोपांच्या खटल्यासाठी न्यायालयाला सहकार्य करण्याच्या हेतूने हजर झाली नाही,” असे न्यायालयाने म्हटले आहे.