बॉलिवूडची क्विन कंगना रानौत सध्या ‘थलैवी’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात कंगना जयललिता यांची भूमिका साकारत आहे. कंगनाची बहिण रंगोली चंडेल हिने हा फर्स्ट लूक ट्विटरवर पोस्ट केला. मात्र नेटकऱ्यांना कंगनाचा हा नवा लूक फारसा पसंत पडलेला नाही. त्यांनी सोशल मीडियावर कंगनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘थलैवी’ हा बायोपिक तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी कंगनाने २० कोटी रुपये मानधन स्वीकारल्याचं समजतंय. जयललिता यांच्याप्रमाणे हुबेहूब दिसण्यासाठी कंगनाने प्रचंड मेहनत घेतली असून तिला प्रोस्थेटिक मेकअपचा आधार घ्यावा लागला होता. या मेकअपचे काही फोटो काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. २६ जून २०२० रोजी हा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.