कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि भारती सिंह जेव्हा एकत्र येतात तेव्हा चाहत्यांचे भरभरुन मनोरंजन करतात. सध्या सोशल मीडियावर त्या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे गाणे गाताना दिसत आहेत आणि त्यांचे गाणे ऐकून एक चाहती चक्क तेथून पळून जाते. कपिल आणि भारतीचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
सध्या सोशल मीडियावर ‘बचपन का प्यार’ हे गाणे व्हायरल आहे. भारती आणि कपिल एका कारमध्ये असून ते दोघे देखील हे गाणे गाताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान तेथे एक चाहती येते आणि त्या दोघांचे गाणे ऐकून त्यांच्यासोबत फोटो काढण्याआधीच पळून जाते. त्या चाहतीला पळताना पाहून भारती म्हणते, ‘ये जानेमन.. कहा भाग रही हो? रुको रुको… फोटो तोह खिचाओ.’ सध्या भारती आणि कपिलचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Video: नोराच्या ‘त्या’ कृत्यामुळे भारती सिंह संतापली; भरस्टेजवरुन तिला खेचत घेऊन गेली
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये भारती आणि कपिल ज्या प्रकारे गाणे गात आहेत ते पाहून सर्वांना हसू अनावर झाले आहे. चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
सध्या भारती ‘डान्स दीवाने ३’ या शोमध्ये सूत्रसंचालन करत आहे. तिचे सेटवरचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. लवकरच भारती ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसणार आहे. सुरवातीला ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये भारती बुआची भूमिका साकारत होती. आता ती कोणत्या भूमिकेत दिसणार हे पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.