कॉमेडियन कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यापासून लांब आहे. पण तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या कपिल त्याचा आगामी ‘फिरंगी’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. या मोशन पोस्टरच्या सुरुवातीला ‘युके’चा झेंडा पाहायला मिळतोय. त्यानंतर पोलिसांच्या गणवेशातील कपिल त्यासमोर उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या पाठीत लाथ मारताना दिसतोय. सिनेमाच्या नावाप्रमाणेच पोस्टरलाही फिरंगी टच दिल्याचे पाहायला मिळत आहे. कपिलची यामध्ये काय भूमिका असेल आणि सिनेमाची कथा काय असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यापार विश्लेषक तरण आदर्शने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या सिनेमाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित केले आहे. तसेच मंगळवारी या सिनेमाचे ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचे त्याने सांगितले. सिनेमाच्या या पोस्टरमध्ये कपिल एका गाडीत बसलेला दिसतो. ही गाडी एक इंग्रज अधिकारी चालवताना दिसतोय. हा तोच इंग्रज अधिकारी आहे ज्याला कपिलने पहिल्या पोस्टरमध्ये लाथ मारली होती.

टेलिव्हिजनवरील ‘द कपिल शर्मा शो’ बंद झाल्यानंतर तो या सिनेमाच्याच कामावर लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या काही दिवसांपासून तब्येत ठीक नसल्याने तो शोचं शूटिंगदेखील करू शकत नव्हता. अनेक सेलिब्रिटी शोमधून परतल्यानंतर वाहिनीने कपिल शर्माला ब्रेक देण्याचा निर्णय घेतला. २०१५ मध्ये कपिलचा पहिला सिनेमा ‘किस किस को प्यार करू’ प्रदर्शित झालेला. मात्र, हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर फारशी जादू करु शकला नव्हता. पण, ‘फिरंगी’कडून फक्त कपिललाच नाही तर प्रेक्षकांनाही बऱ्याच अपेक्षा आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil sharmas new movie firangi second poster released trailer will release soon
First published on: 23-10-2017 at 20:35 IST