बॉलिवूड अभिनेत्री काजोल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. मात्र यावेळी ती चक्क अक्षय कुमारमुळे चर्चेत आहे. करिअरच्या सुरुवातीस काजोलला अक्षय कुमार प्रचंड आवडत होता. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा’ या रिअॅलिटी शोमध्ये तिने हे सिक्रेट करण जोहरच्या मदतीने सांगितलं. तिचा हा थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य पाहा – पतीला घटस्फोट देऊन ही अभिनेत्री राहतेय बॉबी देओलच्या घरात

कपिलच्या शोमध्ये करण जोहरने एक गंमतीशीर किस्सा सांगितला. काजोल एका चित्रपटाच्या प्रिमिअरला गेली होती. त्यावेळी इतर कलाकारांच्या गर्दीत ती चक्क अक्षय कुमारला शोधत होती. त्यावेळी काजोलला अक्षयवर क्रश होतं. त्यामुळे अक्षयला शोधण्यासाठी करण तिला मदत करत होता. दोघेही एकमेकांच्या मदतीने अक्षयचा शोध घेत होते. असा हा चकित करणारा गंमतीशीर किस्सा करणने सांगितला. हा किस्सा ऐकून प्रेक्षकांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला. प्रेक्षक जोरजोराने टाळ्या वाजवून आणखी किस्से सांगण्यासाठी करणला प्रवृत्त करत होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar says kajol had big crush on akshay kumar mppg
First published on: 24-09-2020 at 11:49 IST