एअर हॉस्टेसचा ड्रेस मागून घेतलास का?; करण जोहरने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे रणवीर सिंग ट्रोल

करण जोहरने रणवीर सिंगचा शेअर केलेला व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या अभिनय कौशल्यामुळे बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या भूमिकांपेक्षा जास्त त्याच्या अतरंगी अवतारातील कपड्यांमुळे तो नेहमी चर्चेत असतो. रेड कार्पेट असो वा फॅशन शो असो रणवीर नेहमीच चित्रविचित्र ढंगामध्ये हजर होतो. सध्या सोशल मीडियावर रणवीरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील कपड्यांमुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

बॉलिवूड चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रणवीरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये करण आणि रणवीर फ्लाइटमध्ये असल्याचे दिसत आहे. दरम्यान, रणवीरने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्यावर त्याने एक चष्मा लावला आहे. त्याचा ड्रेस पाहून करण प्रशंसा करताना दिसत आहे.
आणखी वाचा : “ब्लाऊज का उलटं घातलंस?”, वेडिंग लूकमुळे आलिया झाली ट्रोल

रणवीरचा हा ड्रेस करणला तर आवडला पण नेटकऱ्यांना मात्र फारसा आवडलेला दिसत नाही. नेटकऱ्यांनी रणवीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ‘फ्लाइटमध्ये देखील चष्मा कोण लावतं?’ असे एका यूजरने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘एअर हॉस्टेसचा ड्रेस मागून घेतलास का?’ असे म्हटले आहे.

दरम्यान, रणवीर लवकरच ‘८३’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये दिसणार आहे. त्यानंतर ‘सर्कस’, ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Karan johar shared the video of ranveer singh fans said did you ask for air hostesss dress avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या