करण जोहरच्या घरातील ‘टॅलेंटेड म्युजिशियन’;पाहा भन्नाट व्हिडीओ

करण जोहरच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणजे त्याची मुलं

निर्माता- दिग्दर्शक करण जोहरच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणजे त्याची मुलं. त्यामुळे यश आणि रुही यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी बरेचजण उत्सुक असतात. सध्या लॉकडाउनमुळे करण घरी असून त्याच्या मुलांना वेळ देत आहे. त्यासोबतच त्याच्याविषयीचे अनेक किस्से, व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत आहे. यामध्येच त्याने यश आणि रुहीचा एक नवीन व्हिडीओ शेअर केला असून यात दोन्ही मुलं गिटार वाजवत गाणं म्हणताना दिसत आहेत.

लोकप्रिय स्टारकिडमध्ये करणच्या यश आणि रुही कायम चर्चेत असतात. सध्या लॉकडाउनमुळे करण घरात असल्यामुळे दोन्ही मुलं त्यांच्या वडिलांसोबत खेळतांना, मस्ती करताना दिसत आहेत. तसंच करण सुद्धा त्याचा जास्तीत जास्त वेळ मुलांना देण्याचा प्रयत्न करतोय. यामध्येच त्याने  मुलांचा गाणं म्हणतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Clearly singing is not in our genes! Apologies in advance ! #lockdownwiththejohars #toodles

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

यश आणि रुही दोघंही एकाच खुर्चीत बसून गिटार वाजवत होते. त्यांना पाहून करण त्यांच्याजवळ जातो आणि एक व्हिडीओ शूट करतो. या व्हिडीओमध्ये करण त्याच्या मुलांची ओळख आमच्या घरातील ‘टॅलेंटेड म्युजिशियन’ अशी करुन देतो.

दरम्यान, करण बऱ्याच वेळा त्याच्या मुलांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यामुळे चाहत्यांमध्येदेखील स्टारकिड यश आणि रुही यांची लोकप्रियता पाहायला मिळते. अलिकडेच करणने ‘माय डाइट पुलिस’ असा एक व्हिडीओ शेअर केला होता. यात यश आणि रुही, करणला बर्गर खाण्यापासून अडवताना दिसत होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Karan johar states yash and roohi musitian and shares video of their singing ssj

ताज्या बातम्या