करणवीर बोहराच्या घरी चिमुकलीचं आगमन; लक्ष्मी-सरस्वती-पार्वती म्हणत शेअर केला व्हिडीओ

तिन्ही मुलींसोबत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत करणवीरने आनंद व्यक्त केला.

‘नागिन’ या मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता करणवीर बोहराच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. करणवीरची पत्नी तीजय सिधूने मुलीला जन्म दिला. या दोघांना आधी जुळ्या मुली आहेत. बेला आणि व्हिएना अशी त्या दोघींची नावं असून आता आणखी एक चिमुकली त्यांच्या कुटुंबात सहभागी झाली आहे. कॅनडामधील व्हॅनकॉवर या ठिकाणी तीजयची प्रसूती झाली. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला करणवीर मुंबईहून कॅनडाला गेला होता.

तिन्ही मुलींसोबत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत करणवीरने आनंद व्यक्त केला. ‘मला किती आनंद होतोय हे मी तुम्हाला शब्दांत सांगू शकत नाही. मी आता तीन मुलींचा पिता आहे आणि यापेक्षा सुंदर आयुष्य असूच शकत नाही. माझ्या आयुष्यातील या सर्व परींसाठी देवा तुझे खूप खूप आभात’, असं म्हणत करणवीरने तिघींचा उल्लेख लक्ष्म, सरस्वती आणि पार्वती असा केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karanvir Bohra (@karanvirbohra)

करणवीरच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून व कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या तिन्ही देवींसोबत नेहमी खूश राहा, असं म्हणत अभिनेता जय भानुशालीने करणवीरला शुभेच्छा दिल्या. याशिवाय गौहर खान, अश्मित पटेल, माही वीज, युविका चौधरी, श्रुती सेठ, गीता फोगाट यांनीसुद्धा करणवीर आणि तीजयला शुभेच्छा दिल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Karanvir bohra and wife teejay blessed with a baby girl ssv