Video: ‘सियाज गाडी मैं आए हैं, गरीब लग रहे है’, असे म्हणणाऱ्यावर संतापला अभिनेता

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी सियाज गाडी घेऊन गेला होता.

Karanvir Bohra, Karanvir Bohra Video, Karanvir Bohra Angry On Cameraman, Sidharth Shukla, Sidharth Shukla Funeral,
अभिनेत्याने स्वत: हा व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ४० वर्षीय सिद्धार्थवर काल ओशिवरा स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. सिद्धार्थच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. अनेक कलाकार त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. करणवीर बोहरा, आसिम रियाज, वरुण धवन, विद्युत जामवाल, शहनाज गिल, रश्मि देसाई, राहुल महाजन, अली गोनी, युविका चौधरी, प्रिंस नरूला आणि अर्जुन बिजलानी सिद्धार्थच्या घरी जाताना दिसले होते. दरम्यान, सिद्धार्थच्या घरी जात असतानाचा करणवीर बोहराचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीमध्ये त्याला ‘गरीब’ म्हटल्यानंतर तो संतापला आहे.

करणवीरने स्वत: हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये करणवीर आणि त्याची पत्नी पोलिसांसोबत काही तरी बोलत असल्याचे दिसत आहे. दरम्यान एका व्यक्तीचा बॅकग्राऊंडमध्ये आवाज येतो आणि ती व्यक्ती ‘हा तर गरीब आहे. सियाज गाडी घेऊन आला आहे’ असे बोलत असल्याचे ऐकू येत आहे. हा व्हिडीओपाहून करणवीर संतापला आहे.

आणखी वाचा : देसी गर्लचे वेस्टर्न मंगळसूत्र पाहिलेत का? नव्या फोटोशूटने वेधले भारतीयांचे लक्ष

 

View this post on Instagram

 

A post shared by Karenvir Bohra (@karanvirbohra)

हा व्हिडीओ शेअर करत त्याने, “‘सियाज गाडी में आए हैं, गरीह लग रहे हैं’ हे ऐकून मला फार वाईट वाटले. आम्ही येथे ५ स्टार एण्ट्री करण्यासाठी आलो होतो का? आम्ही एका अशा आईला भेटण्यास गेलो होतो जिने आताच तिच्या मुलाला गमावले आहे. पण या अशा लोकांमुळेच मीडियाची बदनामी होते” या आशयाचे कॅप्शन देत संताप व्यक्त केला होता. करणवीरने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

करणवीर बोहरा हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. तो एक निर्माता आणि डिझायनर देखील आहे. त्याने मालिकांसोबतच काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. तसेच त्याने बिग बॉस आणि खतरों के खिलाडी या शोमध्ये सहभाग घेतला होता. २००६मध्ये त्याने टीजे सिद्धूशी लग्न केले. त्याला तिन मुली आहेत. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कुसुम’, ‘कसौटी जिंदगी के’, ‘दिल से दी दुआ’, ‘सौभाग्यवती भव: कुबूल है’ आणि ‘नागिन २’ या मालिकांमधील त्याच्या भूमिका गाजल्या होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Karanvir bohra gets angry on cameraman who said ciaz mai aaya hai poor hai avb

ताज्या बातम्या