आईप्रमाणेच तैमुरही करतोय डाएट, जाणून घ्या त्याच्या प्लॅनविषयी

व्यायामाला महत्व देणाऱ्या करिनाने तैमुरसाठी हा डाएट प्लॅन तयार केला आहे

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आजवर अनेक कलाकारांनी स्टारडम अनुभवला आहे. त्यांच्याच पाठोपाठ आता त्यांची मुलदेखील या स्टारडमचा अनुभव घेत आहेत. या स्टारकिडमधील एक नाव म्हणजे करिना कपूर-खानचा लेक तैमुर अली खान. तैमुर जन्माला आल्यापासून प्रकाशझोतात आहे. एवढ्या लहान वयात त्याचे आज असंख्ये चाहते आहेत. त्यामुळे त्याच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. करिना कपूर तिच्या साईज झीरोसाठी ओळखली जाते. विशेष म्हणजे व्यायामाला महत्व देणाऱ्या करिनाने तैमुरसाठीदेखील एक डाएट प्लॅन तयार केला आहे. याविषयी तिने स्वत: एका मुलाखतीत सांगितलं.

स्वत:ला फिट ठेवणारी करिना तैमुरलादेखील फिट आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यामुळेच तिने तैमुरसाठी एक खास डाएट प्लॅन आखला आहे. तिच्या या प्लॅननुसार तैमुरला ती कधीच बाहेरचे पदार्थ खाऊ देत नाही. इतकंच नाही तर तैमुर कोणाच्याही बर्थ डे पार्टीमध्ये किंवा कार्यक्रमात गेला तरी तो तेथील पदार्थ खात नाही.

“मी स्वत: तैमुरचा डाएट प्लॅन आखते. त्यामुळे त्याच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न करत असते. तैमुर खिचडी, डोसा किंवा इडली यासारख्या पौष्टीक पदार्थंचं खातो. त्याच्या या डाएट प्लॅनमध्ये रोज बदल होत असतो. त्याला आवडेल अशाच पौष्टिक पदार्थांचा समावेश मी त्याच्या डाएटमध्ये करत असते. मात्र त्याला बाहेरचे पदार्थ शक्यतो मी देत नाही. विशेष म्हणजे त्याचा हा डाएट प्लॅन तो एन्जॉयही करतो. त्याला हे सारे पदार्थ आवडतात”, असं करिनाने सांगितलं.

पुढे ती म्हणते, “सुरुवातीला त्याला हे पदार्थ आवडतं नव्हते. मात्र कालांतराने त्याला सवय झाली आणि तो आता आवडीने पदार्थ खातो. या डाएटमध्ये फळं आणि हिरव्या पालेभाज्या यांचाही समावेश आहे”.

दरम्यान, तैमुरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. काही काळापूर्वी बाजारामध्ये त्याच्या नावाच्या बाहुल्या आणि कुकीजदेखील आले होते. इतकंच नाही तर त्याचे फोटो विकत घेण्यासाठी अनेक जण १५०० ते २००० इतकं रक्कमही मोजतात. यावरुनचं त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kareena kapoor khan prepares diet plan for son taimur ali khan