करीना कपूरचे पिंक बिकिनीतले फोटो व्हायरल!

काही नेटकऱ्यांना करीनाचे फोटो आवडले काहींनी करीनाला दिले उपदेश

अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान हे त्यांचा मुलगा तैमूरसह सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मालदिवला गेले आहेत. त्यांच्यासोबत सैफची बहिण आणि अभिनेत्री सोहा अली खान आणि तिचा नवरा कुणाल खेमूही आहेत. स्विमिंग पूलमधील करीना कपूरचे पिंक बिकिनीतले फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यावर काही जणांनी या फोटोंना पसंती दर्शवली आहे.

तर काही जणांनी या फोटोंबाबत नाराजी व्यक्त करत करीनाला उपदेश दिले आहेत. मेक अप शिवाय तू आजारी दिसतेस असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने करीना तू आता मुस्लिम आहेस असे कपडे घालणे, अंगप्रदर्शन करणे तुला शोभत नाही असे म्हटले आहे. असे असले तरीही सध्या सोशल मीडियावर करीना कपूरच्या याच फोटोंची चर्चा आहे.

@discoversoneva

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

 

#holidayvibes @discoversoneva

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

@discoversoneva

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kareena kapoors bikini pics viral on social media

ताज्या बातम्या