..आणि ‘कास्टिंग काऊच’बद्दल बोलली करिश्मा तन्ना

मी अशा गोष्टींना उत्तेजन देत नाही

टेलिव्हिजन विश्वातील काही गाजलेल्या नावांपैकी एक नाव म्हणजे करिश्मा तन्ना. ‘लव स्कूल’, ‘नच बलिए’, ‘बिग बॉस’ यांसारख्या कार्यक्रमांतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या ‘झलक दिखला जा’ या एका डान्स रिएलि़टी शोमध्ये तिचे नृत्यकौशल्य दाखवत आहे. करिश्मा तिच्या परफॉर्मन्समुळे गाजत असतानाच तिने केलेल्या एका वक्तव्यासाठी सध्या ती प्रचंड चर्चेत आली आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान करिश्माने ‘कास्टिंग काऊच’ बद्दलचे तिचे विचार व्यक्त केले आहेत.
‘कास्टिंग काऊच’ आणि फिल्म इण्डस्ट्री हे समीकरण काही नवीन नाही. असे असले तरीही करिश्माच्या या गौप्यस्फोटामुळे सध्या टेलिव्हिजन विश्वात याबाबतची चर्चा रंगत आहे. ‘मी अशा प्रसंगाला थेट तोंड दिलेले नाही. जर असा प्रसंग माझ्यावर उद्भवला असता तर मी या गोष्टींना कधीच उत्तेजन दिले नसते. माझा कधीच अशा गोष्टींवर विश्वास नाही. जर तुम्ही कर्तृत्त्ववान असाल तर तुम्हाला नक्कीच संधी मिळेल’ असे करिश्मा म्हणाली. करिश्मा तन्ना याआधी तिच्या ब्रेकअपमुळे प्रचंड चर्चेत आली होती. उपेन पटेलसोबत झालेल्या ब्रेकअपविषयी बोलताना ‘आमच्या नात्याचा पाया भक्कम होता, पण काही गोष्टी मनाविरुद्ध होत गेल्या. हे एक नाते सोडून लगेचच दुसऱ्या नात्यात गुंतण्याचा आमचा विचार नसला तरी या नात्यात आम्ही वेगळे होण्याचाच निर्णय घेतला आहे’, असे ती म्हणाली. करिश्मा आणि उपेन त्यांच्या नात्याबद्दल पुन्हा विचार करत असले तरीही करिश्माचे सर्व लक्ष सध्यातरी ‘झलक दिखला जा’ या स्पर्धेवरच असून करिश्मा तन्ना लवकरच ‘टिना अॅन्ड लोलो’ या चित्रपटातून झळकणार आहे अशी चर्चा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Karishma tanna speaks about her experience with casting couch

ताज्या बातम्या