बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर हिच्याशी घटस्फोटानंतर व्यावसायिक संजय कपूर तिसऱ्यांदा संसार थाटणार असल्याचे म्हटले जात होते. प्रिया सचदेव हिच्यासह तो लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु होती. २००६ साली मिलियनेअर विक्रम छतवाल याच्याशी अगदी थाटामाटत उच्चभ्रू मंडळींच्या उपस्थित लग्न करणारी प्रिया तेव्हा चर्चेत आली होती. मात्र, हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. लग्नाच्या अवघ्या काही वर्षांनंतरच त्यांनी घटस्फोट घेऊन आपापले मार्ग वेगळे केले.
कुटुंबिय आणि काही जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थित संजय आणि प्रिया हे न्यूयॉर्क येथे विवाहबंधनात अडकणार आहेत. तसेच, संजय आणि त्याचे कुटुंबिय या लग्नाविषयी मौन बाळगून आहेत. करिश्मा-संजयच्या घटस्फोटाचा काळ त्यांच्यासाठी खडतर होता. पण, आता मात्र या दोघांनाही वेगळ्या वाटा निवडत नव्या आयुष्याला सुरुवात केली असल्याची माहिती एका वृत्तपत्राने दिली होती. त्यानंतर आता हे दोघेही विवाहबंधनात अडकल्याचे वृत्त समोर आले आहे. संजय आणि प्रियाने दिल्लीमध्ये अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत रजिस्टर पद्धतीने विवाह केल्याचे कळते. मात्र, यानंतर ते आता न्यू यॉर्कमध्ये खास सेलिब्रेशन करणार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून संजय कपूर आणि प्रिया सचदेव एकत्र असून या दोघांनीही त्यांच्या घटस्फोटाच्या कठीण काळात एकमेकांना मदत केली होती.
https://www.instagram.com/p/BS2kEhrhEpN/
संजयने १३ वर्षांच्या संसारानंतर करिष्माशी घटस्फोट घेतला. या दोघांना समायरा आणि किआन राज ही दोन मुलं आहेत. गेल्याच वर्षी या दोघांचा घटस्फोट झाला असून मुलांचा ताबा करिष्माकडे देण्यात आला आहे. कलाकारांच्या नात्यात येणारे वादळ, ब्रेकअप, लिंकअप ही काही नवीन बाब नाहीये. गेल्या बऱ्याच दिवसांपासून करिश्मा कपूरचेही नाव संदीप तोष्णीवालसोबत जोडले जात आहे. पण, या दोघांनीही आतापर्यंत त्यांच्या नात्याबद्दल काहीच खुलासा केलेला नाही. काही दिवसांपूर्वीच करिष्मा आणि संदीप हे दोघेही एका कौटुंबिक समारंभात एकत्र दिसले होते. संजय कपूरसोबतच्या घटस्फोटानंतर करिश्मा आणि संदीप ‘लिव्ह इन-रिलेशनशिप’मध्ये राहत असल्याचे देखील म्हटले जातेय.