कृष्णाने पत्नीला म्हटले ‘बिर्याणी’, ट्रोल करणाऱ्यांना कश्मीरा शाहने दिले सडेतोड उत्तर

तिने एका मुलाखतीमध्ये ट्रोलर्सला सुनावले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कश्मीरा शाह सध्या चर्चेत आहे. तिच्या बॉडी ट्रांस्फॉर्मेशनमुळे ती सध्या चर्चेत आहे. कश्मीराचा पती कृष्णा अभिषेकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कश्मीराचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्याने दिलेल्या कॅप्शनमुळे कश्मीराला ट्रोल केले जात होते. पण कश्मीरा शांत बसली नाही तिने देखील ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

कृष्णाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कश्मीराचा काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कश्मीरा अतिशय हॉट अंदाजात दिसत आहे. कृष्णाने हा फोटो शेअर करत दिलेल्या कॅप्शनमुळे कश्मीराला ट्रोल केले जात आहे.

कृष्णाने ‘घरी बिर्याणी असेल तर तुम्हाला बाहेरची दाल मखनी कशाला हवी? तुझा अभिमान वाटतो काश (कश्मीरा), तू पुन्हा तुझ्या हॉट अवतारात परतलीस’ या आशयाचे कॅप्शन फोटो शेअर करत दिले होते. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी कश्मीराला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा- ‘घरी बिर्याणी असेल तर..’; पत्नीचा बोल्ड फोटो पोस्ट करत कृष्णाने केली कमेंट

या संदर्भात कश्मीराने हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली. ‘मला ट्रोल करणारे तेच लोकं आहेत जे आधी मला हसायचे. कृष्णाने जी काही कमेंट केली त्या मागच्या भावना तर समजून घ्या ना. कृष्णा माझा पती आहे आणि त्याला माझ्या ज्या गोष्टी आवडतात त्या विषयी तो बोलणार’ असे म्हणत कश्मीराने ट्रोलर्सला सुनावले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kashmera shah blasts trolls for backlashing krushna abhishek biryani remark avb