सोशल मीडियापासून बराच काळ दूर असलेल्या कतरिनाने इन्स्टाग्रामवर इतर अभिनेत्रींच्या तुलनेत उशिरा पदार्पण केलं. सोशल मीडियावर आल्यानंतर शाहरुख खान, अर्जुन कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्टपासून अनेक कलाकारांनी तिचं स्वागत केलं. सध्या बॉलिवूडची ही ‘बँग बँग गर्ल’ ऑनलाइन विश्वात चांगलीच रमली आहे असं म्हणायला हरकत नाही. इन्स्टाग्रामवर ती रोज सुरेख फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. नुकतंच इन्स्टाग्रामवर तिने काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंना तिच्या चाहत्यांनी भरभरून लाईक्स दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कतरिनाचे हे फोटो पाहून तुम्हीली तिच्या प्रेमात पडाल. एकानंतर एक असे तीन फोटो तिने इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. या फोटोंवर Anoesis, Oneirataxia, Meliorism हे शब्द पाहायला मिळत आहेत. प्रत्येक फोटोवर हजाराहून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर कॅटच्या फॉलोअर्सचाही आकडा दिवसेंदिवस वाढतोय.

वाचा : ‘जॅकलिन तिच्या मुलांची नावं फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर असं ठेवेल’

तिच्या करिअरविषयी बोलायचे झाल्यास कतरिना तिचा आगामी ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. चित्रीकरणादरम्यानचेही तिने काही फोटो यापूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटातही ती भूमिका साकारणार आहे. यानंतर शाहरूखबरोबरही ती आनंद एल रॉयच्या चित्रपटात काम करणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif hot photos on instagram
First published on: 23-08-2017 at 21:14 IST