कलाविश्वात कायमच सेलिब्रिटींच्या प्रोफेशनल लाइफसोबत त्याच्या पर्सनल लाइफ चर्चेत येत असतात. यात कलाकारांचे अफेअर्स, ब्रेकअप वगैरेच्या चर्चा या सर्रास होतात.यामध्येच अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या नात्याविषयी अनेक चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे आजही या जोडीची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होते. ही जोडी एकत्र यावी अशी अनेक चाहत्यांची इच्छा आहे. कतरिना आणि सलमान यांच्यात चांगली मैत्री असून या दोघांची पहिली भेट नेमकी कशी झाली हे कतरिनाने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
सलमान आणि कतरिनाची पहिली भेट तिच्या अलवीरामुळे झाली. कतरिना आणि अलवीरा एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणीदेखील आहेत. त्यामुळे अनेकदा त्या एकत्र फिरताना, सुट्टी एन्जॉय करताना दिसतात. याच काळात कतरिना आणि सलमानची भेट झाली होती.
सलमानने वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीमध्ये अलवीराने कतरिनाला आमंत्रण दिलं होतं. विशेष म्हणजे या पार्टीमध्ये अलवीराने कोणत्यातरी मैत्रिणीला बोलावलं आहे याची कल्पनादेखील सलमानला नव्हती. घरात पार्टी असल्यामुळे सलमान तयारी करत होता. याच काळात बाथरुममधून सलमान शर्टलेस होऊन बाहेर आला आणि त्याच्यासमोरच कतरिना उभी होती. सलमानचा हा अवतार पाहून कतरिना त्याला हसली आणि हीच त्यांची पहिली भेट होती.
आणखी वाचा- सलमान आणि अजय आमने-सामने! एकाच दिवशी होणार बिग बजेट चित्रपटांची टक्कर
एकीकडे सलमानला भेटण्यासाठी कतरिना आतूर होती. मात्र, सलमानचा असा अवतार पाहून तिला असू अनावर झालं. तर दुसरीकडे कतरिनाला पाहिल्यानंतर सलमान जागच्या जागीच स्तब्ध झालं आणि ही मुलगी अभिनेत्री म्हणून योग्य असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्यावेळी त्याने कतरिनाला बॉलिवूडमध्ये आणण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, कतरिना आणि सलमान खानने ‘युवराज’, ‘मैंने प्यार क्यों किया’, ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा हैं’, ‘भारत’ या सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.