सनी लिओनीच्या नावावरुन गोंधळली अन् तीन लाइफलाइन असतानाही साडेसहा लाखांच्या प्रश्नाचं उत्तर चुकली

तुम्ही देऊ शकाल या प्रश्नाचे उत्तर..

माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती नेहमी चर्चेत असतो. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या कौन बनेगा करोडपतीचे १२ वे पर्व सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. शोमध्ये येणारे स्पर्धक बुद्धीमत्तेच्या जोरावर प्रश्नांची उत्तरे देऊन पैसे जिंकताना दिसतात. नुकताच शोमध्ये रचना त्रिवेदी या स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. पण त्यांना ६ लाख ४० हजार रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर देता न आल्यामुळे गेम सोडावा लागला.

गुजरातमधील राजकोट येथे राहणाऱ्या रचना त्रिवेदी या हॉट सीटवर बसल्या होत्या. त्यांनी अमिताभ बच्चन यांना त्यांच्या आयुष्यातील काही किस्से सांगितले. त्यांना फिरण्याची आवड असल्यामुळे त्या आतापर्यंत १२ देशांमध्ये फिरुन आल्या आहेत असे त्यांनी म्हटले. शोमध्ये गेम खेळताना तीन लाइफलाइन शिल्लक असूनही त्यांना ६ लाख ४० हजार रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देता न आल्यामुळे त्यांना गेम सोडावा लागला होता. तुम्ही या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता का?

कोणत्या अभिनेत्रीचे खरे नाव हरनीत कौर आहे?
A. सनी लिओनी
B. नीतू कपूर
C. बबिता
D. पूनम ढिल्लो

या प्रश्नासाठी दिलेले पर्याय पाहून रचना या गोंधळल्या. त्यांच्याकडे तीन लाइफलाइन असून ही त्यांनी वापर केला नाही. त्यांनी A. सनी लिओनी असे उत्तर दिले. या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्यामुळे त्यांना ३ लाख २० हजार रुपये घेऊन गेम सोडावा लागला. या प्रश्नाचे योग्य उत्तर B. नीतू कपूर आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kbc 12 contestant rachana couldnot answer this rs 6 lakh question avb

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या