KBC 12: शोले चित्रपटाशी संबंधीत विचारलेल्या या प्रश्नासाठी स्पर्धकाने घेतली लाइफलाइन

जाणून घ्या काय होता प्रश्न…

माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती नेहमी चर्चेत असतो. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या कौन बनेगा करोडपतीचे १२ वे पर्व सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. शोमध्ये येणारे स्पर्धक बुद्धीमत्तेच्या जोरावर प्रश्नांची उत्तरे देऊन पैसे जिंकताना दिसतात. नुकताच शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकाला ‘शोले’ चित्रपटाशी संबंधीत विचारण्यात आलेल्या प्रश्नासाठी लाइफलाइन घ्यावी लागली होती. तुम्ही या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता का?

या आठवड्यात उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या रुचिका या हॉटसीटवर बसल्या होत्या. रुचिका यांना केबीसीमध्ये पहिलाच प्रश्न अमिताभ बच्चन यांचा सुपरहीट चित्रपट शोलेशी संबंधीत विचारण्यात आला होता. पण त्यांनी या प्रश्नासाठी लाइफलाइन घेतली होती. जाणून घ्या काय होता प्रश्न-

शोले चित्रपटात कोणत्या अभिनेत्याने इंग्रजांच्या जमान्यातील जेलरची भूमिका साकारली होती?
A. इफ्तिखार
B. ए के हंगल
C. असरानी
D. जगदीप

या प्रश्नासाठी रुचिका यांना चार पर्याय देण्यात आले होते. पण या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांनी लाइफलाइन घेतली. त्यानंतर त्यांनी C. असरानी हा योग्य पर्याय निवडला. रुचिका यांनी केबीसीमध्ये १२ लाख ५० हजार रुपये रक्कम जिंकली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kbc 12 contestant shole related question avb

ताज्या बातम्या