KBC 13: ८० हजार रुपयांच्या प्रश्नाला स्पर्धकाने सोडला गेम, तुम्ही देऊ शकाल का उत्तर?

जाणून घ्या काय होता प्रश्न

Kaun Banega Crorepati, KBC, kaun banega crorepati 13, kbc 13, Amitabh Bachchan, Big B, KBC questions answers, KBC news, KBC live updates, kbc latest episode, Manju Seth,
स्पर्धकाने ५०-५० ही लाइफलाइन देखील वापरली होती

सध्याचा लोकप्रिय आणि तितकाच चर्चेतील शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती (केबीसी).’ माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणाऱ्या या शोचे बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असल्याचे पाहायला मिळते. नुकताच केबीसी १३मध्ये हॉटसीटवर मंजू सेठी बसल्या होत्या. त्यांनी ८० हजार रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे गेम सोडण्याचा निर्णय घेतला. या ८० हजार रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्ही देऊ शकता का?

मंजू यांना एक फोटो दाखवण्यात आला होता. हा फोटो दाखवून त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. पण मंजू यांना प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नव्हते तसेच त्यांच्याकडे एकच ५०-५० लाइफलाइन होती. ती वापरल्यानंतरही मंजू यांना योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.

Kaun Banega Crorepati, KBC, kaun banega crorepati 13, kbc 13, Amitabh Bachchan, Big B, KBC questions answers, KBC news, KBC live updates, kbc latest episode, Manju Seth,

काय होता प्रश्न?
Unknown नावाचं आत्मचरित्र कोणत्या भारतीयाचं आहे?
A. खुशवंत सिंह
B. राजा राव
C. नीरद सी चौधरी
D. आर के नारायण

या प्रश्नाचे मंजू यांना योग्य उत्तर माहिती नव्हते. त्यांनी ५०-५० ही लाइफलाइन देखील वापरली. पण त्यांनी अखेर खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नाचे योग्य उत्तर C. नीरज सी चौधरी आहे. खेळ सोडताना मंजू यांनी हेच उत्तर दिले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kbc 13 manju seth quit kaun banega crorepati 13 at 80 thousand rupees question avb