मराठी प्रेक्षकांना जवळून ओळखणारे दिग्दर्शक म्हणजेच केदार शिंदे. सामान्य माणसाच्या आजुबाजूला जे काही होत असते ते केदार शिंदे उत्तम पद्धतीने मोठ्या पडद्यावर दाखवतात. केदार शिंदे एक नवीन कथा घेऊन प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. चित्रपटाच्या नावामुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे. ‘बाईपण भारी देवा’ असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. आता सोशल मीडिया पोस्टद्वारे केदार शिंदे यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे.

केदार शिंदे यांनी ट्वीट करत ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. “कुठल्याही निवडणुका जाहीर होण्याआधी आमची तारीख जाहीर! ‘बाईपण भारी देवा.’ २८ जानेवारी २०२२ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!” असे ट्वीट त्यांनी केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी चित्रपटाचे पोस्टर देखील शेअर केले आहे.
आणखी वाचा : शाहिद कपूर ते युवराज सिंह; एक्स गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या लग्नात ‘या’ स्टार्सने लावली होती हजेरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात कौटुंबिक विषय मांडण्यात येणार आहेत. या चित्रटात कोण कोणते कलाकार आहेत? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्या माधुरी भोसले यांच्या स्क्रीनशॉट्स या संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्क्रीनशॉट्स ही निर्मिती संस्था याच चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. टीव्ही, ओटीटी आणि अनेक क्षेत्रात स्क्रीशॉर्टस संस्थेने दर्जेदार कलाकृती करत आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आता ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट २८ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.